*शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय देरकर व कार्यकर्त्यांनी वाहनाची झडती घेतली असता उघड झाला प्रकार*
वणी :- नुकतीच निवडणूक संपन्न झाली असून वणीच्या छ. शिवाजी महाराज चौका समोरील उभारलेल्या इलेक्ट्रिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रांग रूम जवळ एक वाहन मागील ३ ते ४ तासांपासून संशयास्पद उभ असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर व त्यांचे कार्यकर्त्यांनी तपासणी केली असता त्यानं इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेले होते. त्या वाहनाचे कोणतेही दस्त सुरळीत नव्हते त्यामुळे या वाहनाला वणी पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे.
स्ट्राक रूम जवळील १०० मीटर अंतरावर सक्त सुरक्षा असताना देखील महिंद्रा बोलेरो पीक ॲप वाहन क्रमांक एम. एच. १४ एल बी. ९०१७ हे पूर्ण पॅक असलेले वाहन मागील अनेक तासापासून स्ट्राग रूम जवळ उभ होत. त्या वाहनावर शिवसैनिकांनी नजर गेली आणि त्या वाहनाची चौकशी केली असता त्या वाहनात इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेले आढळले. ते साहित्य नेमक कुठ कशाच आहे. कुठ द्यायचे आहे. याची कोणतीही माहिती नाही.
त्याच बरोबर सदर वाहनाचे कोणतेही दस्त सुरळीत नव्हते. त्यामुळे या वाहनावर शंका बळकावली असता शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दिलीप भोयर, शरद ठाकरे, अजिंक्य शेंडे, यांचेसह असंख्य कार्यकर्ते जमले व त्यांनी सदर वाहन पोलिसांना पाचारण करून त्यांना पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश कींद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बेहरणी व त्यांचे सहकारी करीत आहे. याबाबत शहरात मात्र उलट सुलट चर्चेला पेव फुटलं असून बघता बघता पोलिस स्टेशन समोर हजारो नागरिक जमा झाले होते.
जमलेल्या नागरिकांना सांभाळताना पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती. वृत्त लिहेपर्यंत सदर वाहनातील साहित्य हे कोणते आहे व कोणत्या कामाच्या वापरासाठी आहे. यावर मात्र कोणताही निष्कर्ष निघाला नाही. असे तीन वाहन शहरात असल्याची चर्चा आहे.