क्रीडा संकुलातील धावपट्टीची मर्यादा वाढवा.भाजपा युवा शहराध्यक्ष पवन बुरेवार यांची मागणी


कोरपना – येथील तालुका क्रीडा संकुल मध्ये तयार होत असलेल्या धावपट्टीची मर्यादा वाढवण्यात यावी या मागणीचे निवेदन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे , जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर, तहसीलदार कोरपना यांना देण्यात आले.
कोरपना येथे तालुका क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी सद्यस्थितीत धावपट्टी निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ही प्रस्तावित धावपट्टी २०० मीटरचीच तयार करण्यात येत आहे. विविध चाचणी सरावासाठी ४०० मीटरची धावपट्टी असणे आवश्यक आहे. त्यामुळे ४०० मीटरचीच धावपट्टी तयार करण्यात यावी. अशी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी पवन बुरेवार भाजपा युवा शहराध्यक्ष , हर्षल भडगरे, सुरज खोके, आकाश बोंमपलीवार, अक्षय बांधकर, चंद्रकांत काकडे अक्षय नागोसे राहुल प्रज्वल पेटकर , राजू भोस्कर , विजय सोनुले, सुदर्शन दोनलकर, संकेत बोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *