
कोरपना:चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या कोरपना तालुक्यातील कुसळ शरीफ सालाबादप्रमाणे होळी सणाच्या तीन दिवस पूर्वीपासून हजरत अ.रहेमान दुल्हेशहा बाबा यांचा उर्स उत्सव साजरा करण्यात येते निसर्ग रम्य मानीकगड डोंगर पायथ्याशी पकड्डीगडम धरण परिसरातील पूर्वी पासुन ३ दशक पूर्वीची मजार या ठिकाणी असून कुसळ, देवघाट ही पूर्व काळातील वास्तव्य असलेली गावे या ठिकाणी धान्य साठवणूक पेव गड्डी व अनेक शेत परीसरात पूर्व काळातील ओळख देणारे शेती साहित्य साठवणूक व पुरातन विहीरी दिसतात दुल्हेशहा बाबा हे नाव ते घोड्यावर सवार होऊन कुसळ या गावाशेजारी नाल्याच्या काठावर वरात सोबत असताना ते डोळ्या आळ झाले काही दिवसा नंतर त्या ठिकाणी पूर्व काळात कुसळ हे गाव गवतासाठी प्रसिद्ध होते कुसळ गवताची कापणी करताना त्यांना नाल्याच्या काठावर मजार दिसून आले व ही वार्तां गावा-गावात पोहचल्याने तिथे दुल्हेशहा बाबा दरबार पुरातनकाळापासून सुरू आहे.
येथे तेलंगाना,यवतमाळ,चन्द्रपूर, गडचिरोली, वर्धा, भागातून सर्व जाती धर्माचे लोक येथे श्रद्धापूर्ण जियारत व दर्शन घेतात दरवर्षी ३ दिवस भरगच्च कार्यक्रम येथे होतो.
दि.१० मार्च ला परचम कुशाई कुरान खानी दि. ११ मार्च ला संदल दि. १२ मार्च ला कव्वाली कार्यक्रम आयोजित केला आहे अदनान नाझा कव्वाल मुंबई, जुबेर सुल्तानी कव्वाल बंदायु यांचा कार्यक्रम सह कौमी एकता कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये सुधिर मुनगटीवार माजी मंत्री, आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस वरोराचे माजी नगरध्यक्ष एहतेशाम अली इत्यादी उपस्थित राहणार आहे.
हे तिर्थस्थळ सर्व धर्मीय नागरीकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर या ठिकाणी वर्दळ असते शासनाने “क” दर्जा तिर्थस्थळ घोषीत केले आहे.
दुर्गम व आदिवासी भाग असल्याने येथे मुलभूत व पायाभूत विकास कामाची गरज आहे तिन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्था उर्स कमेटी कडून करण्यात आली पोलीस विभागाचे बंदोबस्त चोख ठेवण्यात आले असून पोलीस निरीक्षक यांनी सतत भेट देऊन व्यवस्थांवर नियंत्रण ठेवत आहे आरोग्य विभागाचे प्रा. स्वा. केन्द्र नारंडा अंतर्गत डॉ. केतन बोंदरे मलेरिया वर्कर शुभम पेंदोर यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करूण दिली आहे नगर पंचायत कडून अग्नीशमन सेवा परीसरातील पोलीस पाटील यांना सुद्धा सहभागी करूण सेवा दिल्या जात आहे प्रशासन सुविधा उपलब्ध करूण दिल्याने शांतता पूर्ण उत्सव साजरा होत असल्याचे कमेटी अध्यक्ष आबिद अली यांनी समाधान व्यक्त करत उर्स कमेटीचे शहेबाज अली, बाबाराव सिडाम, मोहब्बत खान, नईम शेख,नदिम अली, नादिर कादरी, इसराईल शेख, वैभव किन्नाके, अजय पोराते,कपिल आत्रम, तसेच गावकरी युवक मोठ्या संख्येने कार्यरत आहे