नारंडा इथे स्वर्गीय इंजिनीयर दिलीप पोटदुखे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण

मंगेश तिखट

कोरपणा तालुक्यातील नारंडा या गावातील स्वर्गीय दिलीप रामदास पोटदुखे इंजिनियर हा 1.फरवरी 2025.रोजी नारंडा कडे आपल्या स्वयं गावी येत असताना सांगोडा व गाडेगाव गावा जवळील एका चार चाकी वाहना ला जबरदस्त धडक बसल्याने स्वर्गीय दिलीप पोटदुखे यांना जब्बर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा रुग्णालय उपचाराकरिता नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या मृत्यू मुळे नारंडा गावात संपूर्ण हर हर व्यक्त केली जात आहेत. अतिशय हुशार व चाणक्य व्यक्ती असून गावातील नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध त्यांच्या जाण्यामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत त्यांची आठवण नेहमीच नारंडा गावकऱ्यांनी उदातीतूनच नारंडा गावातील नागरिकांनी स्मशान भूमिती या ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे आत्म्याला शांती मिळावं याकरिता अंकुश वांढरे,अक्षय बोधे,प्रकाश मोहुर्ले,विनोद कुचनकर, शुभम रणदिवे,अंकित वांढरे साईनाथ भोंगळे, सचिन शेंडे, अतुल भोसकर, रजत रणदिवे, गौरव मोहुर्ले, प्रथमेश मोहुर्ले, इत्यादी गावातील युवक मंडळ मित्र मंडळ व नागरिकांनी त्यांच्या आठवणींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला

जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क*

*सैय्यद नदीम अली*
*(मुख्य संपादक)*
*मोबा.+91 90676 87887*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *