भारतीय जनता पार्टी  घुग्घुस महिला आघाडीच्या वतीने महिला दिवस उत्साहात कार्यक्रम*

*जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न.

मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात स्नेह प्रभा मंगल कार्यालय घुग्घुस येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्नेहमिलन सोहळा व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी,घुग्घुसच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला.

घुग्घुस येथील आ.किशोर जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात महिलांच्या सशक्तीकरणावर मोठ्या उत्साहात कार्यक्रम होत असतात.

यावेळी दि.९ मार्च रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा स्नेहमिलन सोहळा व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार, मार्गदर्शन,सांस्कृतिक खेळ,एक पात्री नाटक व बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून,माजी उपसरपंच संजय तिवारी, निरिक्षण तांड्रा,संजय भोंगळे,पुजा दुर्गम,उषाताई आगदारी,ममता मोरे,वैशाली ढवस,नंदा कांबळे,व अन्य पाहुणे मंचावर उपस्थित होते.

अन्य मान्यवरांना हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच आ.किशोर जोरगेवार यांची माता स्वर्गवासी गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांचापण प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

आ.किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजपाचे जेष्ठ नेत्यांनी व उपस्थित प्रमुख पाहुनेनी मनोगत व्यक्त करतांना म्हणटले की,महिला केवळ घराची जबाबदारीच सांभाळत नाहीत, तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांचे योगदान केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी संपूर्ण समाजाला आणि देशाला घडवण्याचे महान कार्य केले आहे.

भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते ,समाजसुधारक यांची जर का आपण नावे घेतली ,तर पहिलं नाव त्यात डॉ. बाबासाहेबांचे नाव येईलच. कारण बाबासाहेबांना ‘दलित नेते ‘ म्हंणूनच ‘लेबल ‘ केले आहे पण ते फक्त दलितांचे नव्हे तर समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते होते. पण फक्त दलित नेते या अशा लेबलिंग मुळे काय होत की , बाबासाहेबांनी , प्रत्येक नागरिक ; मग तो कोणत्याही जाती -धर्माचा असो , त्याला आपल्या महान कार्यामुळे लाभच झाला आहे , हे कार्यच आपण अमान्य केल्यासारखे होते , खरेतर प्रत्येक नागरिक आज बाबासाहेबांचा ऋणी आहे . हे न फिटणारे कर्ज आहे . समानतेचा , सक्षमतेचा सर्वाना दिला . गेल्या महिन्यात आंतरराट्रीय दिन झाला ..स्त्रियांचे सक्षमीकरण हा म्हंटले तर महत्त्वाचा व कदाचित म्हणूनच चावून चोथा झालेला विषय ! क्वचीत हास्याचा पण ! खरे तर , स्त्री , मग ती कोणत्याही जाती धर्माची असो , सवर्ण ,उच्च जाती मधील स्त्रीसुद्धा शूद्रच होती .मुळातच समाजातील सर्वप्रकारच्या विषमता,स अन्यायाविरोधात बाबासाहेबांबानी प्रचन्ड प्रमाणात त्याचा अभ्यास , चिंतन, लिखाण व कार्य केले.
याप्रसंगी वानिता नियाल, कामिना देेशकर वीना गुचाईत,भारती सोदारी,नितू जयस्वाल,स्मिता कांबळे,नलिनी पिंपळकर,संध्या जगताप,शुशिला डाकरे,अल्का भांडारकर,अर्चना चटकी,मनिषा मेश्राम,बेगम ताई, श्रध्दा पोनाला, संगिता बानो,भूदेवी अटेला व शेकडोच्या वर महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *