
चंद्रपूर / राजुरा :-
चंद्रपुर जिल्हयामध्ये लक्कडकोट गावाजवळ महाराष्ट्र आणि तेलंगना बॉर्डर वर RTO विभागाचा चेक पोस्ट आहे, त्या चेक पोस्ट वर नेहमी ट्रक गाड्यांचे आवागमन होतं असतांना प्रत्येक ट्रक गाडी ड्राइवर कडून एंट्री फी च्या नावावर 500 ते 1000 रुपये घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी एक निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक यांच्यासह खाजगी एजंट च्या नियुक्त्या केल्या आहे, व दररोज लाखों रुपये इथे एंट्री फी च्या नावावर आरटीओ कार्यालयात जमा होतं असून महिन्याकाठी जवळपास 5 कोटी रुपयाची माया गोळा करण्यात येते, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची वरिष्ठाकडे तक्रार देण्यात आली होती, मात्र किरण मोरे यांनी आपली चालाखी करून त्या प्रकरणात स्वतःला वाचवलं मात्र आता त्यांचा भंडाफोड झाला असून त्यांनी ठेवलेल्या खाजगी एजंट जगदिश आनंद डफडे आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी मच्छींद्र विभुते यांना लक्कडकोट आरटीओ चेकनाका येथे 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली असल्याची माहिती असून यांच्यासोबत असलेला एक निरीक्षक मात्र कुठे गायब झाला याची अजूनपर्यंत माहिती समोर आली नाही, दरम्यान या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांच्यावर पण गुन्हे दाखल करावे अशी मागणी होतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ट्रकमालक असुन त्यांचे तेलंगना वरून छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये ट्रक चालतात, त्यामुळे आसीफाबाद ते चंद्रपुर रोडवर चंद्रपुर जिल्हयामध्ये लक्कडकोट गावाजवळ महाराष्ट्र आणि तेलंगना बॉर्डर वर RTO विभाग चा चेक पोस्ट आहे त्या चेक पोस्ट वर नेहमी त्यांचे ट्रक येत जात असतात. तेथे RTO विभाग चे अधिकारी आणि त्यांनी ठेवलेले खाजगी ऐजंट नेहमी त्यांचे गाडीचे विनाकारण कागदपत्रे पाहतात, गाडीचे सर्व कागदपत्रे बरोबर असल्यावर, गाडी अंडरलोड असल्यावर, गाडीवर कोणतापण टैक्स किंवा चालान पेंडीग नसतानाही एन्ट्री फी च्या नावावर ५००/- रू लाच मागणी करत असल्याबाबत लेखी तक्रार एसीबी ला देण्यात आली होती,