मागासवर्गी्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयातून  नोकर भरती रद्द होण्याची शक्यता.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., चंद्रपूर यांच्या अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोबतच सर्वोच्य न्यायालयाचा अवमान करून शासन निर्णय सुद्धा विचारात न घेता केवळ शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अभिमतांवर बैंक नोकर भरतीत आरक्षण हटवून जी बेकायसदेशीर भरती प्रक्रिया सुरु केली होती व जिल्ह्यातील हजारो एससी, एसटी, ओबीसी व विमुक्त भटक्या जमातीच्या सुशिक्षित तरुण बेरोजगार यांच्यावर अन्याय केला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात या बेकायदेशीरपणे होणाऱ्या नोकर भरती विरोधात आवाज उचलून ITI या कंपनीच्या माध्यमातून बोगस पणे घेतली जाणारी नोकर भरतीला स्थगिती देऊन निस्पक्षपणे व पारदर्शी पद्धतीने नोकर भरती करणाऱ्या टीसीएस या कंपनी कडून नोकर भरती घ्यावी अशी मागणी सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दिली होती, त्या तक्रारी वरून चौकशी सुरु झाली व तसें आदेश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर यांना दिल्याने आता ह्या नोकर भरतीला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. बैंक व्यवस्थापनानी ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची जाहीर सूचना काढली जरी असली तरी या नोकर भरतीवर स्थगिती येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान मनसेच्या पाठपुराव्याला हे मोठे यश आले असून बैंकेच्या नोकर भरतीत एससी, एसटी, ओबीसी व विमुक्त भटक्या जमातीच्या आरक्षसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याची माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *