वणी भाजप कार्यालयातच कुणब्यांना दिली कुत्र्याची उपमा, स्वाभिमानी कार्यकर्त्याने एकला बदडले

आ. बोदकुरवारांच्या समोर घडला प्रकार

  • माजी खासदार हंसराज भय्या यांनी घातली समजूत
    *भाजपाच्या प्रचार शुभारंभात अपशकुन


वणी :- “साले कुणबी पाचशे रुपयात विकल्या जातात, विजेच्या खांबावर मुतणाऱ्या कुत्र्या सारखी अवस्था कुणब्याची झाली आहे”. असे आक्षेपार्ह वक्तव्य एका पदाधिकाऱ्यांने भाजप प्रचार कार्यालयात आ. बोदकुरवार यांच्या समोर केले. या प्रकारामुळे स्वाभिमान दुखावलेल्या एका स्वाभिमानी कार्यकर्त्याने त्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदडले. यानंतर माजी खासदार हंसराज भय्या अहिर यांनी सर्वांची समजूत काढली मात्र घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.

बसस्थानक परिसरात भाजपचे निवडणूक प्रचार कार्यालयाचा सोमवारी सायंकाळी शुभारंभ होता. यावेळी एका पदाधिकऱ्याची जीभ घसरली, मात्र बोदकुरवार यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचवेळी एका कुणबी कार्यकर्त्याचा स्वाभिमान जागा झाला व त्याने घडलेला प्रकार जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांना सांगितला. बोर्डे यांनी लगेचच कार्यालयात धाव घेतली व त्या कुणबी समाजाला बदनाम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांला चंगलीच मारहाण केली. ही घटना काल तारीख ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ हा अपशकुणाने झाला आहे. आ. बोदकुरवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल बस स्टॉप समोरील एका हॉटेलच्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. त्या नंतर माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार संजीवरेड्डी बोदकुवार व इतर भाजपाचे पदाधिकारी नियोजन करीत असताना सुधीर साळी नामक भाजपाचा पदाधिकारी हा कुणबी समाजाला जातीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी उपस्थित अनेक कुणबी नेते मात्र मूग गिळून बसून होते. यातील एक कार्यकर्ता निखिल खाडे यांनी सुधीर साळी याने कुणबी पाचशे रुपयात विकल्या जाणारे असून त्यांची इलेक्ट्रिकच्या खांबावर लघु शंका करणाऱ्या सारखी गत आहे. असे म्हणताच खाडे यांनी असे कसे बोलता भाऊ म्हणून टोकले. असता सुधीर साळी यांची अजून जीभ घसरतच होती परंतु उपस्थित आ. बोदकुरवार हे बघ्याची भूमिका बजावत होते.

शेवटी निखिल खाडे यांना कुणब्यांना हा आपमान सहन झाला नाही त्याने सरळ जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांना सदर प्रकार सांगितला असता बोर्डे यांच्या तळपायाची आज मस्तकात गेली व त्यांनी सुधीर यांना कॉल केला व तू कुठे आहे. म्हणून विचारले व सुधीर हे आमदार बोदकुरवार व भाजपचे रवी बेलूरकर यांच्या सोबत प्रचार कार्यालयात बसून असल्याची माहिती मिळताच बोर्डे यांनी कार्यालय गाठले व सुधीर यांच्या कानशिलात सळ “साळी”त आवाज काढत यांना चांगलीच मारहाण केली. त्यात सुधीर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. यावेळी हंसराज अहिर यांनी भांडणाची सोडवणूक केली यात निखिल खाडे यांनी ही आपला हात साफ केला. यात साळी हे चांगलेच जखमी झाले आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुणबी समाजात भाजपा व्देश निर्माण होईल म्हणून हे प्रकरण कार्यालयातच दाबण्यात आल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *