कोरपना प्रतिनिधि ]
राजुरा गोविन्दपुर राष्ट्रीय महामार्ग कामासाठी कंपनी कुसळ शिवारातील देवघाट नाल्यावर ठिक ठिकाणी रस्ते कामासाठी रेती दगड मातीचा वापर केला व कुसळ गावालगत रपटा तयार केला ते ४ महिण्यातच कोसळले या रपट्या वरूण ट्रक्टर जिप शेती कामासाठी बंडी बैलाने येणे जाने सुरु राहते कंपनी कडे तक्रार करूण सुद्धा दखल घेतली नाही गावकऱ्याना बंधारा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले ते फोल ठरले संपूर्ण नाल्यातून रेती दगडाचा उपसा झाल्याने पाण्याचे स्त्रोत नष्ट झाल्याने शेतक ऱ्याच्या सिंचनावर परिणाम होत आहे २ वर्षापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेच्या रसत्यावर माथा फाटा ते धानोली पर्यंत ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूकी चा खोळंबा होत आहे रपटा खचल्याने वाहन अपघात घडून निष्पाप जिवाला मुकण्याची पाळी आली आहे कुसळ नागरीकानी बंधारा दुरुस्ती व रपटा दुरुस्ती तात्काळ करावे अन्यथा होणाऱ्या अपघात व नुकसानीला जि आर आय एल कंपनी जबाबदार राहील अशी तक्रार निवेदनातून केली आहे